सासवड वरून गराडे मरीआई घाट मार्गे खेड शिवापूर कडे जातात कासुर्डी परिसरात रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना व परिसरातील उद्योग व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चाकण परिसरातील उद्योग व्यावसायिकांना आवश्यक भौतिक सुविधा न पुरवल्याने उद्योगांचे स्थलांतर होत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन कासुर्डी खेड शिवापूर परिसरातील उद्योगांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. या परिसरातून सासवडकडे येण्यासाठी सोयीचा मार्ग असल्याने या भागातून वाहतूकही लक्षणीय वाढलेली आहे. या भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. मात्र ते सरसकट न झाल्याने काही भागात चांगला रस्ता तर काही भागात सततच्या पावसामुळे निसरडा झालेला रस्ता अशी अवस्था आहे. शासकीय यंत्रणांनी तातडीने या भागात पाहणी करून पावसाळा संपेपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी उपाय योजना करून रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
खेड शिवापूर परिसरातील रस्त्यांची दुरावस्था नागरिक त्रस्त
