Headlines

बारामती तालुक्यात विविध ठिकाणी अवैध दारू विरुद्ध विशेष मोहीम राबवून वेगवेगळ्या ठिकाणी छापे

रुपये 21,320/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून केली कारवाई

बारामती -बारामती तालुक्यातील मौजे पारवडी गावचे हद्दीत होले हार्डवेअर दुकानाचे पाठीमागे इसम नामे सोमनाथ भगवान बेंगारे,रा.पारवडी,ता.बारामती,जि.पुणे याचेवर छापा टाकला असता त्याचे ताब्यातुन सिमला संत्रा,टेंगो पंच वर्णनाच्या बाटल्या किंमत 3, 800/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास राजीव शिंदे सहा.पोलीस फौजदार करीत आहेत.

तसेच मौजे वंजारवाडी,ता.बारामती,जि.पुणे गावचे हद्दीत बारामती कुंभारकर वस्ती येथे बिल्डर अमृततुल्य टपरीच्या पाठीमागे आडोशात इसम नामे नारायण दिलीप कदम, रा.कुंभारकरवस्ती वंजारवाडी,ता. बारामती जिल्हा पुणे याच्यावर छापा टाकला असता त्याचे ताब्यातून देशी दारू टॅंगो पंचच्या बाटल्या असा एकूण 1, 080 /- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दीपक दरेकर हे करीत आहेत.

तसेच मौजे सोनगाव ता.बारामती जिल्हा पुणे गावचे हद्दीत सोनगाव झारगडवाडी रोडचे कडेला एका पत्र्याचे शेडमध्ये इसम नामे दीपक राजेंद्र जाधव रा.जारकरवाडी ता.बारामती जिल्हा पुणे याचेवर छापा टाकून कारवाई केली असता त्याचे ताब्यातून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण 15,210/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास संतोष बडे सहा.पोलीस फौजदार हे करीत आहेत.

तसेच मौजे सोनगाव ता.बारामती जि. पुणे गावचे हद्दीत इसम नामे सोमनाथ दादाराव मदने रा.झारगडवाडी,ता.बारामती जिल्हा पुणे याचेवर छापा टाकून कारवाई केली असता त्याचे ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच व एक गावठी हातभट्टी दारूचे कॅन असे एकूण 940/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सुजय जगताप पोलीस हवालदार हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.नारायण पवार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोसई श्रीरंग शिंदे,पोलीस अंमलदार संतोष बडे,सुधीर काळे,संतोष कांबळे, अमोल खाडे,विठ्ठल तरंगे,महिला पोलीस अंमलदार आफरीन शेख यांनी केली आहे.