एका छोट्याशा चुकीमुळे पाच जणांचं कुटुंब झोपेतच गुदमरून संपलं, आई-बापासह तीन चिमुकल्यांचा मृत्यू

Photo of author

By Sandhya


श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. एका चुकीने कुटुंबातील 5 जणांचा जीव घेतला. थंडीपासून वाचण्यासाठी हे कुटुंब इलेक्ट्रिक ब्लोअर लावून झोपले, मात्र गुदमरल्याने पाचही जणांचा मृत्यू झाला. सकाळी कुटुंबाला जाग न आल्याने शेजाऱ्यांना काहीतरी अनुचित प्रकार घडल्याची भीती वाटत होती. त्यांनी पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली.
पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना एक पुरुष, महिला आणि त्यांची तीन मुले बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. ही घटना श्रीनगरमधील पांद्रेथान भागातील शेख मोहल्ला येथे घडली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृतक भाड्याच्या घरात राहत होते. राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

शेजाऱ्यांनी फोन करून नियंत्रण कक्षाला माहिती दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंट्रोल रूममध्ये एक कॉल आला होता. फोन करणाऱ्याने सांगितले की, त्यांच्या शेजारच्या एका भाड्याच्या घरात 5 लोक राहतात, परंतु आज सकाळपासून घरात काहीच हालचाल नाही. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, बेल वाजवूनही कोणी दरवाजा उघडला नाही. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना पाचही जण बेशुद्ध अवस्थेत आढळले.
तात्काळ आपत्कालीन पथके आणि पोलिसांनी पाचही जणांना जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र पाचही जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. हे कुटुंब मूळ बारामुल्ला येथील असून येथे भाड्याच्या घरात राहत होते. ज्या खोलीत पाचही लोक बेशुद्ध अवस्थेत आढळले, त्या खोलीत इलेक्ट्रिक ब्लोअर सापडले. त्यामुळे या पाचही जणांच्या मृत्यूचे कारण गुदमरणे असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा चौकशी करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे

Leave a Comment

You cannot copy content of this page