शिक्रापूरमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, शाळेत जाणाऱ्या मुलांना चिरडलं, बापासह दोन मुलांचा जागीच मृत्यू

Photo of author

By Sandhya

शिक्रापूरः शाळेमध्ये निघालेल्या मुलांना ट्रकने चिरडल्याच घटना पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे घडली आहे.

दुचाकीवरून शाळेमध्ये जात असताना ही आज घटना (दि. ६) घडली. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये वडिलांबरोबर दोन मुलांचा मृत्यू झाला.

गणेश खेडकर, तन्मय खेडकर आणि शिवम खेडकर अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावं आहेत. तन्मय तिसरीमध्ये शिकत होता तर शिवम दुसरीमध्ये शिकत होता शिक्रापूर – चाकण महामार्गावर अपघात झाला असून याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर – चाकण महामार्गावर सकाळी ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.

शाळेसाठी दुचाकीवरून चाललेल्या एका युवकासह दोन चिमुकल्यांना ट्रकने चिरडले. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. गणेश खेडकर हा गणेश दोन मुलांना दुचाकीवरून शाळेमध्ये सोडण्यासाठी घेऊन जात होता. त्याचवेळी पशु खाद्य वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये ट्रकने तिघांनाही चिरडले. शाळेमध्ये पोहचण्यापूर्वीच दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत. शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. सध्या याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

Leave a Comment

You cannot copy content of this page