All-party protest at Belsar toll plaza on Pune-Pandharpur National Highway.

Photo of author

By Sandhya

पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर बेलसर टोलनाक्यावर सर्व पक्षीय आंदोलन.

टोल भरणार नाही भूमिकेवर ठाम ,

पुरंदर मधील टोल नाका बंद करावा आंदोलकांची मागणी


जेजुरी,दि.८ (वार्ताहर ) पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर बेलसर फाटा टोलनाक्यावर तमाम पुरंदर वासिय  टोल भरणार नाही तसेच  भौगोलिक दृष्टया सदोष असलेला हा टोल नाकाच  बंद करावा या मागणीसाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनासाठी पुरंदरवासीय टोलविरोधी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून टोल वसुलीची सक्ती केल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
पुणे पंढरपूर महामार्गावर बेलसर फाटा नजीक टोल तीन महिन्यापासून टोल नाका सुरु झाला असून पुरंदर तालुक्यातील भूमिपुत्रांना टोल रद्द व्हावा यासाठी आज पर्यंत सात वेळा आंदोलन झाले आहे.
 स्थानिक  पुरंदर वासीय नागरिक कसलाही टोल भरणार नाही हा टोलनाका दुसरीकडे स्थलांतरित करावा या मागणीसाठी सोमवारी (दि.८)  सकाळी पुरंदर वासिय टोल विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले.

पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे अजून काम पूर्ण झाले नाही,विकसित करण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डे,चिरा असून गती रोधकासारखा हा रस्ता असून येथे टोल आकाराला जातो,सरकारच्या आडमुठ धोरणाची सजा जनतेला भोगावी लागत आहे. महामार्गासाठी अनेक शेतकरी,दुकानदार,नागरिकांच्या जागा भूसंपादित केल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. उलट त्यांनाच या जा करण्यासाठी टोल भरावा लागतो हे अन्याय कारक आहे.पुरंदर वासिय टोल भरणार नाही ही भूमिका आंदोलनाची होती.
तालुक्यातील लोकप्रतिनिधी आजी माजी आमदार जनतेचा प्रश्न सोडविण्यासाठी टोल नाक्यावर येऊ शकत नाही ,पुरंदर मधील नागरिकांना टोल रद्द व्हावा ,तसेच येथील टोल नाकाच काढून टाकावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष उमेश जगताप यांनी दिला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संदीप जगताप,यांनी पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी बांधवांसाठी हा महामार्ग निर्माण केला असून त्याचा भुर्दंड खंडोबा भाविकांना का असा सवाल करीत टोलनाका बंद करावा
माजी विश्वस्त शिवराज झगडे ,यांनी मागणी केली. यावेळी जि. प.सदस्य अजय इंगळे ,आम आदमी पार्टीचे दत्तात्रय कड ,राष्ट्रवादी शरद पवार गट उपाध्यक्ष शामराव धुमाळ , शिवसेना ठाकरे गट तालुकाध्यक्ष अभिजित जगताप , महेश जेधे आदींनी टोलप्लाझा बंद करण्यात यावा अशी जोरदार मागणी करत आपली भूमिका स्पष्ट केली .यावेळी दादा फाऊंडेशनचे यशवंत दोडके , राष्ट्रवादी शहराध्यक्ष रमेश लेंडे , जिसा अध्यक्ष विकास पवार , मनसे शहराध्यक्ष गणेश कुंभार ,शिवसेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल सोनवणे ,नगरसेवक योगेश जगताप ,शिवाजी जगताप ,सत्यवान उबाळे ,सुशील राऊत ,विजय झगडे ,बापूराव भोर , कामगार नेते सुरेश उबाळे ,माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार ,माजी उपाध्यक्ष रमेश बयास , जयाद्री सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब झगडे , जेष्ठ पत्रकार प्रकाश खाडे यांचेसह पूर्व पुरंदर मधील विविध पक्षांचे व संस्थांचे प्रतिनिधी कार्यकर्ते तसेच तालुक्यातील विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी टोल नाक्याचा निषेध म्हणून जागरण गोंधळ घालण्यात आला.

Leave a Comment

You cannot copy content of this page