
बारामती येथे खासदार सुप्रिया सुळे यांचे आंदोलन कांदा आणि दुधाला हमीभाव देण्याची केली मागणी
कांदा आणि दुधाला किमान भाव मिळावा या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथील तीन हाथी चौकात शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे…. या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले… त्यांच्यासोबत युवा नेते युगेंद्र पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते… गेल्या आठवड्यात सुप्रिया सुळे यांनी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाचा दौरा केला होता, यावेळी बहुतांश गावांतील शेतकऱ्यांनी कांद्याच्या दराचा मुद्दा उपस्थित केला आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत दूध आणि कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या…… याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या होमपिचवर राज्य सरकारचा निषेध करण्याचा निर्णय घेतला….. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. सुप्रिया सुळे यांनी हाताला काळी फिती बांधून आंदोलनात सहभाग घेतला. ‘बळीराजाच राज्य येऊ दे , ‘शेतकरी वाचवा, देश वाचवा’ अशा विविध घोषणा देत सरकारविरोधात आक्रमकपणे आंदोलन करण्याचा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.