braking news : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपच्या वाटेवर!

Photo of author

By Sandhya

braking news : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपच्या वाटेवर!

पंजाबच्या अगोदरच्या कॉंग्रेस सरकारचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि मंत्रिमंडळातील त्यांचेच सहकारी नवज्योत सिंग सिध्दू यांच्यात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चिवरून महाभारत झाले होते. त्यात अमरिंदर यांची खुुर्ची गेली, मात्र त्या खुर्चीने सिध्दू यांनाही हुलकावणी दिली.

नंतर कॉंग्रेसचे सरकारच गेले आणि आम आदमी पक्ष राज्यात सत्तेवर आला. केवळ येथेच हा विषय थांबला नाही. अमरिंदर यांनी स्वत:चा पक्ष काढला व तो भारतीय जनता पार्टीत विलीनही करून टाकला. तर सिध्दू यांची जुन्या हत्या प्रकरणात तुरूंगात रवानगी झाली.

या सगळ्या नाट्यमय घडमोडींत चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली. ते चन्नीही विधानसभेतील नामुष्कीजनक पराभवानंतर गायब झाले होते. आता प्रदीर्घ काळानंतर ते प्रकटले असून त्यासोबतच ते भाजपच्या वाटेवर असल्याची बातमीही आली आहे.

दिल्या जात असलेल्या बातम्यांनुसार चन्नी यांनी भाजपच्या काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. मात्र कॉंग्रेस नेते प्रतापसिंह बाजवा यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

भाजपकडूनच या खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी सिध्दू यांची सुटका झाली आहे. तसेच जालंधर येथील कॉंग्रेस खासदाराच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून कॉंग्रेसला रामराम केलेल्या नेत्यालाच येथून आपने रिंगणात उतरवले आहे. हा घटनाक्रम पाहता पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Leave a Comment