DS Group launches first ever television commercial for ‘Catch Premium Iodized Pink Rock Salt’. The commercial will be aired on television and digital media, as well as social media and OTT.

Photo of author

By Sandhya

डीएस ग्रुपची ‘कॅच प्रीमियम आयोडाइज्ड पिंक रॉक सॉल्ट’साठी पहिली वहिली दूरचित्रवाणी जाहिरात सादर ही जाहिरात दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यमांसह समाजमाध्यमे आणि ओटीटीवर प्रसारित होणार

अग्रगण्य वेगवान ग्राहक वस्तू (एफएमसीजी) समूह आणि बहुव्यवसायिक कॉर्पोरेशन असलेल्या धर्मपाल सत्यपाल समूह (डीएस ग्रुप) अंतर्गत लोकप्रिय ब्रँड कॅच सॉल्ट अँड स्पायसेसने कॅच प्रीमियम आयोडाइज्ड पिंक रॉक सॉल्टसाठी आपली पहिली वहिली दूरचित्रवाणी जाहिरात (टीव्हीसी) सादर केल्याची घोषणा केली आहे. डेंट्सू क्रिएटिव्ह वेबचटणी यांनी संकल्पित आणि निर्मित केलेली ही मोहीम डीएस समूहाच्या संवादाला मसाले आणि स्प्रिंकलर्स श्रेणीपलीकडे विस्तार देते.

ही जाहिरात मीठ श्रेणीतील डीएस समूहाच्या उत्पादनाबाबत भक्कम जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली असून, ती दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यमांसह समाजमाध्यमे आणि ओटीटीवर प्रसारित होणार आहे, ज्यामुळे लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत व्यापक पोहोच सुनिश्चित होईल.

ही जाहिरात शेजारच्या खेळाच्या मैदानातील हलक्याफुलक्या आणि आपुलकीच्या प्रसंगावर आधारित आहे, जिथे दोन माता आणि त्यांची मुले संवाद साधताना दिसतात. या कथानकाचा केंद्रबिंदू एक लहान मुलगी आहे, जी आत्मविश्वासाने कॅच प्रीमियम आयोडाइज्ड पिंक रॉक सॉल्टची उत्पत्ती आणि फायदे समजावून सांगते आणि सहज संवादातून उत्पादनाच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकते.

या मोहिमेबाबत बोलताना अर्नब घाटाक चौधरी, महाव्यवस्थापक, विपणन, कॅच सॉल्ट अँड स्पायसेस, म्हणाले, “कॅच प्रीमियम आयोडाइज्ड पिंक रॉक सॉल्ट मोहिमेद्वारे डीएस समूहाने उत्पादनकेंद्री कथानक निवडले आहे, जे या पिंक रॉक सॉल्टची वैशिष्ट्ये दैनंदिन जीवनातील सहजसोप्या प्रसंगातून अधोरेखित करते. या चित्रफितीत दोन शेजाऱ्यांमधील रंजक संवादातून उत्पादनाच्या वेगळेपणाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे, तसेच ब्रँडला कथानकाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. ही कथा कॅचच्या ‘कारण अन्न हे केवळ अन्न नसते’ या तत्त्वज्ञानाला बळकटी देते आणि योग्य घटक दैनंदिन जेवण कसे खास बनवतात, हे साजरे करते.”

सुरजो दत्त, प्रमुख क्रिएटिव्ह अधिकारी – डेंट्सू क्रिएटिव्ह वेबचटणी, म्हणाले, “सर्जनशील दृष्टिकोनातून आम्ही मीठ या केवळ स्वयंपाकघरातील मूलभूत घटकाकडून एक सजग आणि माहितीपूर्ण निवडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना कथानकाच्या केंद्रस्थानी ठेवून, त्यांच्या मीठाबद्दलच्या अनपेक्षित जागरूकतेचा—त्याचा रंग, उत्पादनाचे फायदे इत्यादींचा—वापर करून पारंपरिक विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट शेवटी ‘अन्न हे केवळ अन्न नसते’ या विचारावर येतो—ते आपण दररोज करत असलेल्या सजग निवडींचे प्रतिबिंब आहे.”

ही जाहिरात २० एप्रिलपासून प्रमुख दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यमांसह समाजमाध्यमे आणि ओटीटीवर प्रसारित होणार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page