गच्चीवर पेरू तोडण्यासाठी गेलेल्या आईचा आणि मुलीचा विद्युत वाहिनीचा धक्का लागून जागीच मृत्यू

Photo of author

By Sandhya

गच्चीवर पेरू तोडण्यासाठी गेलेल्या आईचा आणि मुलीचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून जागीच मृत्यू

ओझर दत्तनगर मधील वसाहतीत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. गच्चीवर पेरू तोडण्यासाठी गेलेल्या आईचा आणि मुलीचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.

तर जावई राहुल रणशूर व त्यांची दोन मुले लांब फेकल्याने बचावली. ही घटना आज (दि.६) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

आई मीना हनुमंत सोनवणे, मुलगी आकांक्षा राहुल रणशूर अशी मृत मायलेकीची नावे आहेत. या दोघी घरावरील गच्चीतील पेरू तोडण्यासाठी गेल्या होत्या.

यावेळी हातातील रॉड विद्युत वाहिनीला लागल्याने त्यांना जोराचा धक्का बसला. राहुल रणशूर यांनी गच्चीवरून आरडाओरड ऐकू आल्याने त्यांनी धाव घेतली. कॉलनीतील नागरिकही धावून आले.

गच्चीतील पाण्याची टाकी फुटल्याने पूर्ण बंगल्यात वीज प्रवाह उतरला होता. ओझर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगाव येथे पाठवले. पुढील तपास ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत.

Leave a Comment