Golden Jubilee of the Department of Parliamentary Affairs Release of guidebooks by the Minister of Parliamentary Affairs Chandrakantdada Patil The information booklets of the Department of Parliamentary Affairs will be useful for good governance

Photo of author

By Sandhya

संसदीय कार्य विभागाचा सुवर्णमहोत्सव संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन संसदीय कार्य विभागाच्या माहितीपुस्तिका सुशासनासाठी उपयुक्त ठरणार

  • उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील

संसदीय कार्य विभागाची स्थापना १ जुलै १९७५ रोजी झाली. सुरुवातीला सामान्य प्रशासन विभागाचा भाग असलेला हा विभाग ८ जानेवारी २०१६ रोजी स्वतंत्र विभाग म्हणून अस्तित्वात आला. राज्य शासन आणि विधानमंडळ यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करणाऱ्या या विभागाने ५० वर्षे पूर्ण केली असून, विभागाने स्व-मार्गदर्शिका प्रकाशित करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या संसदीय कार्य विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी तीन महत्वपूर्ण मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, संसदीय कार्य विभागाचे सचिव सतीश वाघोले, सहसचिव प्रभाकर पवार, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तसेच तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र विकसित भारत’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी प्रशासनात सुशासन असणे अत्यावश्यक आहे. या पुस्तिकांमुळे नवीन अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना विधानमंडळाचे कामकाज समजून घेणे अधिक सुलभ होईल. प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी संसदीय कार्य विभागाचे सचिव सतीश वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पुस्तिका तयार केल्या आहेत. विभागात नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल, ज्यामुळे कामकाजात गती आणि अचूकता येईल, असा विश्वासही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.v

Leave a Comment

You cannot copy content of this page