केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी कर्नाटक दौर्यावर येत आहेत. बंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील देवनहळ्ळी मतदार संघातील धीरज मुनिराजू यांच्या प्रचारार्थ रोड-शो होणार आहे.
दुपारी 3.45 ते 5.15 यावेळेत देवनहळ्ळी, होस्कोटे, नेलमंगल आणि दोड्डबळ्ळापूर येथे रोड-शो करतील. सायंकाळी शहा बंगळूर शहरात पोहोचणार आहेत. खासगी हॉटेलमध्ये भाजप नेत्यांची बैठक घेणार आहेत.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुराप्पा, निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शोभा करंदलाजे यांच्यासह भाजप नेते उपस्थित राहणार आहेत.