प्रफुल्ल पटेल : इंडिया आघाडीत अनेक मतभेद आहेत

Photo of author

By Sandhya

इंडिया आघाडीत अनेक मतभेद आहेत

इंडिया आघाडीत अनेक मतभेद आहेत. येणाऱ्या काळात लोकांचा विश्वास इंडिया आघाडी असं सांगण्याचा जो प्रयत्न सुरू आहे ते शक्य होणार नाही.आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट ए डॉट हे इंडिया आघाडीच खर नाव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी केली आहे.

वर्धेच्या धुनिवाले मठात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात प्रफुल पटेल बोलत होते.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, युवा प्रदेश अध्यक्ष सूरज चौहाण, ईश्वर बाळबुधे, सुनील फुंडे, प्रशांत पवार, बाबा गुजर, क्रांती धोटे, मेघा पवार, इ पी एफ पेंशन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे, पुंडलिक पांडे, डोंगरे, शरद शहारे, आशिष ठाकरे, मयुर डफळे, रोशन तेलंगे, नीळकंठ पिसे, देवीलाल जयस्वाल, उज्वल काशीकर बलराज लोहे आदी उपस्थित होते.

इंडिया आघाडीत कीती मतभेद आहे हे मुंबईत पहायला मिळाल. इंडिया आघाडीच चिन्ह साध्या लोगोबाबत एकमत करू शकले नसल्याने लोगोच अनावरण थांबवावे लागले.

विविध समस्या या आघाडीत असल्याचे आता स्पष्ट दिसत आहे, अशीही टीका पटेल यांनी केली. लवकरच निवडणूक आयोगाच्या निकालात खरी राष्ट्रवादी कोणाची हे स्पष्ट होईल, असेही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.

वर्धा जिल्ह्यात उत्पादित शेतमालावर उद्योग झाले नाही. फक्त नेत्यांनी विकास स्वतःचा केला, अशीही टीका खासदार पटेल यांनी केली. यावेळी कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Comment