PUNE CRIME : येरवड्यात आढळला कुत्र्यांनी खाल्लेला अर्धवट मृतदेह…

Photo of author

By Sandhya

धक्कादायक

येरवडा येथील न्याती बिल्डिंगच्या समोरील झाडाझुडपांत सडलेला अर्धवट अवस्थेतील मृतदेह मिळून आला आहे. दरम्यान, मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाच्या कमरेखालील भाग थोडाच शिल्लक असून, वरील भाग कुत्र्यांनी पूर्णपणे खाल्लेला दिसून येत आहे.

याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाकडून गुरुवारी सकाळी पावणेनऊ वाजता येरवडा पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस तातडीने तेथे पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता या मृतदेहाला आठ ते दहा दिवस झाले असावेत. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून, मृताचा बराचसा भाग कुत्र्यांनी खाल्लेला दिसून येत आहे.

कमरेपासून खालील भाग थोडा शिल्लक असून, कवटी व वरील भाग पूर्णपणे खाल्लेला आहे. हा मृतदेह बेवारस व्यक्तीचे असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला आहे. या भागामध्ये बरेच फिरस्ते, बेघर लोक झोपत असतात. त्यांच्यापैकी कोणाचा तरी हा मृतदेह असावा, असा संशय आहे, असे येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.

Leave a Comment