वंचितला आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. सर्व प्रमुख नेते प्रकाश आंबेडर यांच्याशी पुन्हा चर्चा करतील. जर ते नाराज असतील तर ती नाराजी आम्ही दूर करणार.
प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आले तर आमची ताकद वाढेल असे विधान ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असताना आज केले. ते मुंबईमधून बोलत होते.
इव्हीएमला शिव्या म्हणजे भाजपला शिव्या जागा वाटप वाद संदर्भात शरद पवार यांच्यासोबत आज (दि.२१) फोनवरुन चर्चा झाली अस म्हणतं ते म्हणाले, आमचा पक्ष हा प्रादेशिक पक्ष आहे म्हणूनच महाराष्ट्रातील जास्त जागांवर आमचा दावा आहे.
आम्ही कोल्हापूरमधील आमची जागा सोडली, हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला आमची एकतरी जागा असावी हा आमचा आग्रह आहे. अस म्हणतं त्यांनी सांगलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राहूल गांधी यांच्या शक्ती शब्दावरुन राजकारण सुरु आहे. गरीब इव्हीएमला शिव्या घालत आहेत. आणि इव्हीएमला शिव्या म्हणजे भाजपला शिव्या. असा टोला यावेळी त्यांनी मारला. ते असेही म्हणाले की, “राज्यात औरंगजेबसारखी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही. मोदींनी रडगाणं थांबवाव असं म्हणतं त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.