”…त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीसांना समज द्यावी” जरांगे पाटलांची मागणी…

Photo of author

By Sandhya

”…त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीसांना समज द्यावी”

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावात भव्य सभा घेतली. यावेळी  त्यांनी गुणरत्न सदावर्ते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला.

सदावर्तेना आमच्या अंगावर सोडले जात आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांना समज द्यावी, अशी मागणी यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी केली.

यावेळी बोलताना जरांगे यांनी “हिंसा करण्याची भाषा सदावर्ते करत आहेत. मराठा समाज हिंसा करत नाही. आझाद मैदानावर त्यांनी मराठा समाजाच्या घोषणा दिल्या. मला अटक करण्याची ते मागणी करत आहेत. पण, मला अटक करणे इतकं सोपं नाही”, असे म्हटले.

त्यासोबतच “मराठा समाजाचं गुणरत्न सदावर्ते यांनी एकदा वाटोळं केलंय. मराठ्यांच्या विरोधात तेच कोर्टात गेले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्ते यांना समज द्यावी.

सदावर्ते फडणवीसांचे कार्यकर्ते आहेत. मराठा अंगावर घेऊ नका. याच मराठ्याने तुम्हाला १०६ आमदार निवडून दिले आहेत हे विसरू नका. केंद्रात आणि राज्यात सरकार येण्यामध्ये मराठा समाजाचा मोठा वाटा आहे, ” असेही जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले.

सभेच्या वेळी जरांगे पाटील यांनी,”मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना समज द्यावी. ते खालचे कार्यकर्ते आमच्या अंगावर पाठवत आहेत.

मराठ्याने तुमच्यासाठी काहीही केले आहे. माझी विनंती आहे मराठा समाजाला आरक्षण द्या, तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. मराठ्यांना विरोध करण्याचं बंद करा आणि त्यांना तातडीने आरक्षण द्या,  अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

Leave a Comment