उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राहनार उपस्थित
बारामती – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’च्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता सोमेश्वर मंदिर,करंजे येथे होणार आहे. कार्यक्रमाला सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे बारामती तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी केले आहे.
