



नागपंचमी व पहिला श्रावण सोमवार निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने प्राचीन शिवमंदिर काळा वाडा समोर नरपतगिरी चौक येथे नागरिकांना खिचडी व केळी वाटपाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचेआयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष राहुल तांबे, व्यापारी सेलचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, तृतीय पंथ पुणे शहराध्यक्ष निर्जला गायकवाड, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा महिला अध्यक्षा नीता गायकवाड, पुणे शहर महिला उपाध्यक्ष डिंपल इंगळे, यांनी केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पुणे मनपा पीएमटी चे माजी अध्यक्ष भीमराव पाटोळे,
सेजल देशपांडे, गुलशन शेख, सुनिता बडेकर, रोशन आरा कुरेशी, दिनेश परदेशी, दिनेश अर्धाळकर, उमेश परदेशी, ईस्तियाक बागवान, संजय भाऊ वारभुवन,महेंद्र लालबिगे, अकील सय्यद, अलीम शेख, नईम शेख, महेश गुंडाले, आदी यावेळी उपस्थित होते
