Headlines

धडक -पती पत्नीचा दुर्दैवी अंत ,जेजुरी मोरगाव राज्यमार्गावरील घटना


कष्टकरी दांपत्याच्या मृत्यू मुळे परिसरात शोककळा –
जेजुरी,दि.२३ (वार्ताहर ) जेजुरी -मोरगाव राज्यमार्गावर पुण्याहून बारामतीकडे जाणाऱ्या शिवाई बसची दुचाकीला धडक बसून पती पत्नीचा दुर्दैवी अंत झाला.ही घटना सोमवारी (दि.२३ ) सकाळी ७:४५ च्या सुमारास घडली.महेंद्र पोपट नाझीरकर वय-३५ , रेश्मा महेंद्र नाझीरकर वय-३२ ,रा.नाझरे कडेपठार (खैरेवाडी )ता.पुरंदर , अशी दांपत्याची नावे असून याबाबत चिमाजी पोपट नाझीरकर यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . हयगय करून बेजबाबदारपणे बस चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल बसचालक अनिल जीवराज आडसुळ ,रा.कळंब ,जि. धाराशिव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत थोडक्यात वृत्त असे की ,सोमवारी सकाळचे सुमारास महेंद्र नाझीरकर ,व रेश्मा नाझीरकर हे दांपत्य आपल्या दुचाकीवरून (एम एच १२-एन के ५१०३) मोरगावहून जेजुरीकडे येत असताना पेट्रोल पंपानजिक पुण्याहून बारामतीकडे जाणाऱ्या दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करणाऱ्या शिवाई बसने (क्र. एम एच ०४ एम आर ३६७१) दुचाकीस जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीवरील दोघे पती पत्नी २०ते २५ फूट फरपटत गेले जागीच त्यांचा मृत्यू झाला .पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील करत आहेत .
चौकट
कष्टाळु दांपत्याच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ ,
येथील किर्लोस्कर फेरस कंपनीत हंगामी कामगार म्हणून कार्यरत असलले शेतकरी परिवारातील महेंद्र नाझीरकर व त्यांची पत्नी रेश्मा हे अत्यन्त कष्टाळु दांपत्य होते जेजुरी शहरात महाद्वार रोड व चिंचेच्या बागेत फळे विकण्याचा व्यवसाय करून परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या पती पत्नीच्या अपघाती मृत्यूमुळे शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.