Headlines

गुरू गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित आयोजित आरोग्य शिबिरातदीडशे भाविकांनी घेतला शिबिराचा लाभ

गुरु गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित श्री गुरू गोरक्षनाथ दिग्विजयनाथ आश्रम ट्रस्ट व डॉ म्हस्के हॉस्पिटल यांच्या वतीने रविवार दि 22 रोजी आळंदी येथील आश्रमात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक विधी बरोबरच आयोजित आरोग्य शिबिरात दीडशे भाविकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

 आळंदी येथील साई बाबा मंदिरा शेजारी असणाऱ्या गुरू गोरक्षनाथ आश्रमात दरवर्षी गुरू गोरक्षनाथ प्रकट दिना निमित्त धार्मिक उपक्रमा बरोबरच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महंत योगी दिग्विजय नाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ चेतन म्हस्के,ट्रस्टचे पदाधिकारी अभिजीत दातार,सुधीर हामकर,वर्षा तळेकर,मौनी महाराज व भाविक उपस्थित होते.
 गुरू गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित पहाटे रुद्राभिषेक,गोरक्ष सहस्त्रनामवली,पूजा महाप्रसाद आदी धार्मिक उपक्रम उत्साहात साजरे झाले.

डॉ चेतन म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिरात हिमोग्लोबीन, रक्तदाब, हाडांची घनता, पित्ताशय, हार्निया, मूत्रपिंड, पोटाचे आजार याबाबत तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले. या शिबिराचा 155 भाविकांनी लाभ घेतला