Headlines

माजी आमदार संजय चंदूकाका जगताप यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर महादेवास महारुद्राभिषेक

सासवड : सासवड येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्रावण उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या महारुद्राभिषेक व महापूजेचा मान माजी आमदार संजयजी चंदूकाका जगताप आणि सौ. राजवर्धिनी संजय जगताप यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी श्री सिद्धेश्वर महादेवास पितळेची सुवर्ण प्रभावळ अर्पण करण्यात आली.

श्रावण उत्सवानिमित्त १६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता श्री सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या वतीने एकतारी भक्तिसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ७ वाजेपर्यंत उत्तरा देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रुद्राभिषेक व महापूजेचे आयोजन करण्यात आले.

१७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता माजी आमदार संजय चंदूकाका जगताप व सौ. राजवर्धिनी संजय जगताप यांच्या हस्ते महारुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर गणेश सरनाईक काका यांच्या हस्ते महाआरती पार पडली. या धार्मिक सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

उत्सवानिमित्त सकाळी ९ वाजता भाविकांसाठी खिचडी महाप्रसाद व फराळाचे वाटप करण्यात आले. श्री. तुषार बंटी जगताप, डॉ. सुमित काकडे, नंदकुमार जगताप, अतुलशेठ जगताप, संदिप टिळेकर, संदिप मेरुकर, सुनीलकाका जगताप, मोहनआप्पा जगताप आणि सुरज उत्तम जगताप यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सासवड शहरासह परिसरातील हजारो नागरिकांनी श्री सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घेतले तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता सासवड पोलीस ठाण्याच्या वतीने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सासवड नगर परिषदेच्या वतीने मंदिर तसेच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रकाशव्यवस्थाही करण्यात आली होती.

केतकावळे येथील बालाजी मंदिर व्यवस्थापनाचे बाळासाहेब बाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता व्यवस्था केली. त्यामुळे उत्सव काळात भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध झाले.

श्री सिद्धेश्वर महादेव देवस्थान मंदिर सासवड सुधार समितीच्या वतीने उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व भाविक, देणगीदार, प्रशासन, पोलीस, नगर परिषद आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *