Police take major action against drug smugglers in Patas area

Photo of author

By Sandhya

पाटस परिसरात अमली पदार्थांचे तस्कर पोलिसांची मोठी कारवाई

पाटस : दौंड तालुका पारस येथे एका तरुणाकडे मेफेड्रोन हा ड्रग्ज अमली पदार्थ मिळवून आल्याने एकच खळबळ उडाली. संबंधित तरुणाने हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याचे समोर आले. गुरुवारी (ता.२३) मध्यरात्री पाटस – कुसेगाव रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आदित्य माने (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर पाट्स परिसरामधे अंबिका नगर डोंगरेश्वर श्रीसिमेंट कंपनी या भागामधे नशेली अमली पदार्थाचे मोठ्या प्रमाणामधे विक्री होते. अशे नागरीकांचे म्हणने आहे.

याबाबत यवत पोलीस स्टेशन निरिक्षक नारायण देशमुख व उपनिरीक्षक विजय कोल्हे यांनी माहिती दिली. पाटस कुसेगाव रस्त्यावर एक जण मेफेड्रॉन हा घातक ड्रग्ज अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, सहाय्यक फौजदार महेंद्र फणसे,पोलिस हवालदार गुरुनाथ गायकवाड, विकास कापरे,शौकत मद्दी, विनोद काळे, जालिंदर बंडगर या पोलीस पथकाने पाटस- कुसेगाव रस्त्यावर बारकाईने लक्ष ठेवले. मध्यरात्री दीडच्या सुमारास आरोपी आदित्य माने हा संशयितरित्या कालव्या लगत दिसून आला. पोलीस पथकाने त्यास अडवून चौकशी केली. त्यावेळी काही प्रकार समोर आला. त्याच्याकडे मेफेड्रोन हा अतिशय घातक ड्रग्ज अमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी त्यात तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे चौकशी सुरू केली.यावेळी त्याच्याकडे अल्पप्रमाणात ड्रग मिळाली. आरोपी माने यांच्याविरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

याप्रकरणी पुढील तपास निरक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे करीत आहेत.

दरम्यान पाटस परिसरात ड्रग्ज आढळून आल्याने किंबहुना विक्री करण्यासाठी आणल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार किती दिवसापासून सुरू होता.तसेच हा अंमली पदार्थ कोणाला विक्रीकरण्यासाठी आणला होता. या बाबी तपासात निष्पन्न होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे

Leave a Comment

You cannot copy content of this page