Trustees and police stopped Swami Nalinanand Giri Maharaj’s team from entering ‘Bhimashankar’, one of the twelve Jyotirlingas. Pressure from Swami in America; Police: Rude language used.

Photo of author

By Sandhya

बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या,,’भीमाशंकर’मध्ये स्वामी नलिनानंद गिरी महाराजांच्या पथकास विश्वस्त व पोलिसांनी रोखले अमेरिकेतील स्वामींचा दबाव; पोलिस यंत्रणेला : उद्धट भाषा वापरली.

जंगलवासी श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर दुरुस्तीमुळे बंद असल्याची माहिती असतानाही अमेरिकेतून आलेल्या स्वामी नलिनानंद गिरी महाराजांनी दर्शनासाठी दबाव टाकत उद्धट भाषा वापरल्याचा प्रकार उघड झाला. मात्र पोलिसांनी नियमांनुसार त्यांना पुढे जाण्यास रोखले. स्वामी हे अमेरिकेतील ‘इटर्नल व्हॉईस’ संस्थेचे अध्यक्ष असून त्यांच्या सोबत सुमारे २० अमेरिकन, ३० भारतीय नागरिक १५ वाहनांतून आले होते.
सध्या मंदिरासमोरील सभामंडप व पायरी मार्गाच्या कामांमुळे तीन महिन्यांपासून प्रशासनाकडून मंदिर भाविकांसाठी बंद आहे. तरीही स्वामींनी मोठ्या आवाजात दबाव टाकत मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस हवालदार सुरेश काटे यांनी नम्रपणे समजावून सांगत
नियमांची अंमलबजावणी केली आणि पथकाला पुढे जाण्यापासून रोखले. यावेळी स्वामी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून “आमच्या मोठ्या ओळखी आहेत, परिणाम भोगावे लागतील,” अशी भाषा वापरली तरी पोलिसांनी कर्तव्य बजावले.
देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे म्हणाले, मंदिर बंद असल्याची माहिती देऊनही परवानगी न घेता येणे आणि प्रशासनावर टीका करणे चुकीचे आहे. स्वामींना कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती. लेखी परवानगीशिवाय प्रवेश देता येणार नाही, असे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते, असे अध्यक्ष सुरेश कौदरे म्हणाले. परवानगी नसताना येऊन दबाव टाकणे व भीमाशंकरची बदनामी करणे योग्य नाही. संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सरपंच दत्तात्रय हिले यांनी केली आहे. परदेशातून आले असले तरी नियमांचे पालन आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येऊन गोंधळ घालणे योग्य नाही, असे उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे यांनी स्पष्ट केले. गेले अनेक महिने प्रशासनाने भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद केले आहे असे सांगितले गेले आहे तरी देखील भाविक दर्शनासाठी येत आहेत त्यामुळे असे प्रकार मंदिर परिसरात घडत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page