Headlines

जेजुरी एमआयडीसी मधील बर्जर पेंट कंपनी समोर उभे असणाऱ्या केमिकल टँकर मुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता.

कंपनीवर कारवाईची मागणी.

डॉ रामदास कुटे 
    अध्यक्ष जेजुरी उद्योजक संघटना

जेजुरी  वार्ताहर दिनांक 26  जेजुरी एमआयडीसी मधील बर्जर पेंट कंपनी समोर सतत उभे असणाऱ्या ज्वलनशील केमिकल टँकर मुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून  जेजुरी उद्योजक lसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडे लक्ष वेधले असता कंपनी व्यवस्थापनाकडून अरेरावी करण्यात आली. सदर कंपनी व्यवस्थापनावर शासनाने कारवाई  करण्याची मागणी जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे यांनी केली आहे.

याबाबत डॉ रामदास कुटे यांनी सांगितले की, जेजुरी एमआयडीसी आवारात सुमारे दोनशे लहान मोठे कारखाने असून बर्जर पेंट कंपनीत रंग निर्मिती केली जाते. यासाठी लाखो लिटर केमिकल वापरले जाते. हे केमिकल अत्यंत ज्वलनशील असून दररोज 30 ते 35 केमिकलचे टँकर कंपनी समोरच्या असणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभे केले जातात. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला इतर काही कारखाने आहेत.
या रस्त्याच्या बाजूला उभे केलेल्या टँकर जवळच अनेक टँकर चालक गॅस, स्टोव्ह ,चुली पेटवून स्वयंपाक करतात त्यामुळे ही बाब गंभीर असून यातून मोठी दुर्घटना घडू शकते. मोठी दुर्घटना घडल्यास त्याला सामोरे जाण्याची यंत्रणा येथे उपलब्ध नाही त्यामुळे मोठी हानी होऊ शकते.
जेजुरी उद्योजक संघाने याबाबत प्रशासन,पोलिसांना याबाबत निवेदन दिले आहेत.
तसेच बर्जर कंपनीला अनेक वेळा पत्रे देऊन ही त्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले आहे.
सोमवार दिनांक 26 रोजी जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ रामदास कुटे, पदाधिकारी रवींद्र जोशी, पांडुरंग सोनवणे यांनी बर्जर कंपनीत जाऊन कंपनी समोर उभे असलेल्या केमिकल टँकर बाबत सूचना केल्या असता, कंपनी व्यवस्थापनाने अरेरावीची भाषा केल्याचे डॉ रामदास कुटे यांनी सांगितले.
यावेळी जेजुरी पोलिसांना बोलावून कंपनीच्या समोर असणाऱ्या रस्त्यावरील केमिकलचे टँकर बाजूला हटविण्यात आले. तसेच भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी बर्जर कंपनी व्यवस्थापनावर शासनाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.