महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव घनश्याम जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी प्र. रा. कोपार्डे आणि सहायक कक्ष अधिकारी सुनील जाधव यांनीही महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
