

‘श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ’
शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवड
दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवड येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडीच्या विविध गाण्यांवर उत्कृष्ट नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. विद्यार्थ्यांच्या सुंदर नृत्य सादरीकरणासाठी सौ. ताई माळवे मॅडम व सौ. अश्विनी सुतार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सांस्कृतिक विभागाच्या सदस्या सुप्रिया खळदकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुनिता नवले मॅडम यांनी केले.
सौ. सुषमा वढणे मॅडम यांनी गोकुळाष्टमीचे महत्त्व व श्रीकृष्णाच्या बाललीलांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरांचे महत्त्व समजले.
यावेळी शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या व समन्वयक आदरणीय रेणुका सिंग मर्चंट मॅडम तसेच उपप्राचार्या सौ. सुषमा रासकर मॅडम यांनी सुरेल भजन सादर करून कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण केले. त्यांच्या सुंदर गायनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व गोपिकांच्या वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली. दहीहंडीच्या उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी “गोविंदा आला रे आला!” अशा जयघोषात आनंद साजरा केला.
या उत्सवातून विद्यार्थ्यांना एकता, सहकार्य, संघभावना तसेच भारतीय संस्कृती व परंपरांचे महत्त्व समजले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, आनंदमय आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
