Headlines

शिक्षक आमदारकीच्या रणांगणात मंगेश चिवटेंची दमदार एंट्री; शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे–डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने उमेदवारी; मंत्री उदय सामंत,प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन

पुणे – पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली असून, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत अधिकृतपणे दंड थोपटले.मंत्री उदय सामंत साहेब आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते,समर्थक तसेच शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.भगवे झेंडे,घोषणांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त जोश यामुळे परिसर शिवसेनामय झाला.
या प्रसंगी राज्यसभा खासदार ज्योती ताई वाघमारे,आमदार सुहास बाबर,आमदार महेंद्र दळवी, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर,पैलवान चंद्रहार पाटील, सातारा संपर्कप्रमुख शरद कणसे, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे बापूसाहेब अडसूळ,बाजीराव चव्हाण,किरण साळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे,कोल्हापूर जिल्हाप्रमुख मनमोहन खोत,शहरप्रमुख विनायक जाधव,उपशहरप्रमुख अतुल साळोखे,शिरोळ तालुकाप्रमुख सचिन डोंगरे, गगनबावडा तालुकाप्रमुख अक्षय साखरे आणि जयसिंगपूर शहरप्रमुख महेश धनवडे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला.
शिक्षकांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत प्रभावीपणे वाचा फोडणे, शिक्षकांचा सन्मान आणि हक्कांसाठी ठामपणे आवाज उठवणे, या भूमिकेला केंद्रस्थानी ठेवून मंगेश चिवटे यांची उमेदवारी असल्याचे यावेळी समर्थकांकडून सांगण्यात आले.
उमेदवारी अर्ज दाखल होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली. शिवसेनेच्या भगव्या झेंड्यांनी आणि घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. या शक्तिप्रदर्शनातून आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेची संघटनात्मक ताकद दाखवून देण्यात आली.
“अर्ज भरला बरका… आता भेटू विजयी मिरवणुकीत!” या जोशपूर्ण घोषणेने कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. मंगेश चिवटे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील राजकीय वातावरणाला चांगलीच धार आली असून,शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत आता मंगेश चिवटे विरुद्ध इतर उमेदवार अशी थेट राजकीय रंगत पाहायला मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *