‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प
▪️ प्रभात फेरी, आदिवासी मेळाव्याद्वारे अभियानाचा शुभारंभ; १२ लाभार्थ्यांना पेसा दाखल्यांचे वाटप पुणे, दि. २१ : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६…
