माळेगाव पोलीस ठाण्याच्या कंपाऊंडच्या कामावर मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
पाण्याचा नळ सुरू करताना २३ वर्षीय निखिल पवार याला विजेचा तीव्र धक्का; बारामती मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू माळेगाव (बारामती) – माळेगाव पोलीस ठाण्याच्या वॉल कंपाऊंडचे बांधकाम सुरू असताना पाण्याचा नळ सुरू करण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय मजुराचा विजेच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. निखिल उमेश पवार (वय २३,रा.आसमाईच्या पाठीमागे,सुतगिरण,पणदरे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव…
