Headlines

केडगाव महावितरण गलथल कारभारामुळे कडेठाण परिसरामध्ये युवकाचा मृत्यू

दौंड तालुका कडेठाण येथील रेल्वे स्टेशन लगत महावितरण चा विद्युत पोल वादळी वाऱ्याने रस्त्यावर पडल्याने दोन चाकी वाहन धडकून चालक राहुल दिलीप खळतकर वय 25राहणार नांनगाव हा युवक जागीच मृत्यू पावला सदर युवक कुरकुभ औद्योगिक वसाहतीमध्ये सिप्ला कंपनीमध्ये नोकरीला होता कामावरुन तरुण सुटल्या वर कडेठाण मार्गाने रेल्वे भुयारी मार्गाने जात असताना लोखंडी खांबाला धडकून अपघात झाला सुमारे दोन तास वादळी वाऱ्याने पोल रस्त्यावर पडला होता मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याची नागरिकांत बोलजात आहे महावितरणच्या गलथन कारभारामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेला या घटनेमुळे गावातील नागरिकाकून हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेचा पुढील तपास पाटस पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम व त्यांचे सहकारी करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *