शेतकरी कृती समितीच्या मेळाव्यातून शेतकरी नेते सतिश भैय्या काकडे यांची आक्रमक प्रतिक्रिया……..
सोमेश्वरनगर – शेतकरी,कष्टकऱ्यांच्या हितासाठी व आर्थिक विकासासाठी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात ३५,४० वर्षे एकच संचालक व एकच चेअरमन ही घराणेशाही पद्धत बंद करावी व नवीन चेहऱ्यांना काम करण्यास संधी द्यावी अशी आक्रमक भूमिका शेतकरी कृती समिती,स्वाभिमानी शेतकरी संघटना,शेतकरी नेते सतिश भैय्या काकडे यांनी शेतकरी मेळाव्यातून व्यक्त केली.
