Headlines

शेतीमाल खरेदी करताना तोलमोल करू नका! उपसभापती नानासाहेब आबनावे : बाजार समितीच्या उत्तम नगर उप बाजाराचे उद्घाटन

मॉल मधून खरेदी करताना तोल मोल केली जात नाही. वस्तूवरील किंमत देऊन खरेदी केली जाते. मात्र,शेतकरी मोठ्या कष्टाने शेतीमालाचे उत्पादन करतो. त्याची तोलमोल केली जाते, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे शेतीमाल खरेदी करताना तोडमल करू नका, असे आवाहन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नानासाहेब आब नावे यांनी केले आहे. उत्तम नगर उप बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे उपसंचालक विकास दांगट पाटील, माजी उपसभापती शेखर दांगट पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर, नगरसेविका अनिता इंगळे, बाजार समितीचे संचालक लक्ष्मण केसकर, शशिकांत गायकवाड, प्रकाश हरपळे, नीलकंठेश्वर आडते असोसिएशनचे अध्यक्ष वसंतराव उर्फ आबा चांदगुडे, उपाध्यक्ष ज्योस्ना पाटील, सचिव गणेश पायगुडे, सर्व संचालक,
बाजार समितीचे उपसचिव मंगेश पठारे, सहाय्यक सचिव शिवाजी कंद, रामदास सावंत, उत्तम नगर विभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे, गटप्रमुख विक्रम दामगुडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, व्यापारांसह नागरिक उपस्थित होते. या उप बाजाराला स्व विष्णुपंत दांगट पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. विकास दांगट पाटील म्हणाले सध्या नागरिकरण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उप बाजाराचा फायदा होईल. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून द्यावा. येथे महिला बचतगटांसाठी स्वतंत्र दालन तयार करावे. अशी मागणी नगरसेविका अनिता इंगळे यांनी केली. सूत्रसंचालन दत्ताभाऊ पासलकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *