Headlines

कोंढवा नशामुक्त करण्यासाठी भव्य जनजागृती रॅली

नगरसेवक हाजी गफुर पठाण यांच्या वतीने आयोजन

कोंढवा प्रभाग क्रमांक-19 मध्ये नगरसेवक अँड.हाजी गफुर पठाण यांच्या वतीने नशामुक्तीसाठी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.कोंढवा भागातील बहुतांश युवक नशेचे आहारी जात असताना कोंढवा पोलीस स्टेशनच्या वतीने नशेचे साहित्य विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले होते.या कारवाईचे समर्थन करण्यासाठी सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात होणाऱ्या कारवाईसाठी आम्ही सर्व कोंढवावासीं कोंढवा पोलीस स्टेशन व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. संतोष खेतमाळस यांच्या सोबत आहोत असे यावेळी नगरसेवक गफुर पठाण यांनी सांगितले.यामध्ये कोंढवा भागातील सर्व शाळेचे विद्यार्थी,शिक्षक,मुख्याध्यापक, मौलाना आणि उलेमा व स्थानिक नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *