Headlines

“धामणीत खंडोबा बाणाईचा शाही विवाह सोहळा जल्लोषात

मंचर :धामणी (तालुका आंबेगांव) येथील खंडोबा देवस्थान मंदिराच्या प्रांगणात पारंपारिक वाद्याच्या गजरात व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत शाही थाटात शुक्रवारी श्रावण पौर्णिमेनिमित्त”सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात.भंडारा खोबरे उधळून खंडोबा बाणाईचा विवाह सोहळा संपन्न झाला. शुक्रवारी पहाटे श्रावण पौर्णिमेला (राखी पौर्णिमा )खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अकरा जोडप्यांच्या हस्ते रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला.नंतर भाविकांच्या उपस्थितीत आरती केली.त्यानंतर सेवेकरी दादाभाऊ भगत.प्रभाकर भगत.सुभाष तांबे.शांताराम भगत.राजेश भगत.नामदेव भगत.अनिरुध्द वाळूंज.यांनी व महिला भाविकांनी स्वयंभू सप्तशिवलिंगाला व सर्वांगसुंदर खंडोबा व बाणाईच्या पंंचधातूच्या लोभसवाण्या मुखवट्यांना चंदनऊटीचा लेप दिला.व त्यावर सुंगधी दवणाच्या अत्तरात मिश्रित केलेली पिवळीधम्मक हळद लावण्यात आली.श्री खंडोबा व बाणाई यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त मंदिराच्या गाभार्‍यात आकर्षक फुलांची सजावट केलेली होती.खंडोबाला व बाणाईच्या देखण्या मूर्तीना बाशिंग व मुंडावळ्या बांधण्यात आल्या.त्यानंतर आकर्षक वस्रालंकाराने सजवलेल्या व बाशिंग व मुंडावळ्या बांधलेल्या खंडोबा व बाणाईचे मुखवटेची मिरवणूक सकाळी सहा वाजता मंदिरात विसावली.मंदिराच्या आवारात नवरदेव खंडोबाच्या मुखवट्याचे महिलांनी औक्षण करुन स्वागत केले.त्यानंतर सनई व तुतारीच्या व ढोलाच्या निनादात बाशिंगच्या मुंडावळ्या घातलेल्या व हिरवी साडी परिधान केलेल्या व वस्रालंकार घातलेला बाणाईचा मुखवटा मंदिरातून सेवेकरी मंडळीनी लग्नमंडपात वाजतगाजत आणला.त्यानंतर मंगलाष्टकाला सुरुवात करण्यात येऊन खंडोबा व बाणाईचे मुखवट्यावर फुलांच्या पाकळ्याची व अक्षता व भंडार्‍याची उधळुन वाद्याच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीत सदानंदाचा येळकोट चा जयघोष करुन खंडोबा व बाणाईचा विवाह सोहळा पार पडला.त्यानंतर उपस्थित वर्‍हाडी मंडळीना प्रसाद वाटण्यात आला.या शाही विवाह सोहळ्याचे पौरोहित्य प्रमोद देखणे्. पोपट भोजने. गणपत भोजने.गणेश जारकर.भाऊ भोजने.यांनी केले. यावेळी सेवेकरी.मानकरी मंडळी व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. खंङोबा मंदीराचे दोन्ही महाद्वाराचे बाजूला दगङी दिपमाळ करण्याचा कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.येणाऱ्या चंपाषष्ठीपर्यन्त दिपमाळेचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थ व सेवेकरी मंङळीनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *