

पुणे शहर परिमंडल महावितरण मधील बंनगार्डन डिव्हिजन अंतर्गत व पर्वती डिव्हिजन अंतर्गत अधिकाऱ्यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराबद्दल यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची हांडी फोडो आंदोलन रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालय समोर करण्यात आले होते. महावितरणचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात व त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्य अभियंता.अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी क्रांतिवीर लहुजी सेने तर्फे करण्यात आली या संदर्भाचे निवेदन क्रांतिवीर लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी प्रशासन कार्यकारी अभियंता सुरेश रामदास खाकसे यांना देण्यात आले.
या आंदोलनामध्ये बाळासाहेब मोहिते, महेश सकट, सुरज खंडाळे, निलेश वाघमारे, रोहित अवघडे, लोंढे ताई आदी उपस्थित होते.
