Headlines

लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलच्या गावभेट दौऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन;

मा.आमदार संजय जगताप,पुरुषोत्तम जगताप यांच्यासह सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक २०२६ लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलच्या गावभेट दौऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचारसभा घेण्यात आल्या.मांडकी,लळपतवाडी,जेऊर,पिसुर्टी या गावभेट दौऱ्यात भाजपा नेते मा.आमदार संजय जगताप,पुरुषोत्तम जगताप यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी,सभासदांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला‌.श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी त्यांच्या कार्यकाळात कारखान्याचा कारभार चांगल्याप्रकारे सांभाळला आहे व सभासदांच्या ऊसाला चांगला भाव मिळवून दिला आहे.याच कृतज्ञतेतून गटतट बाजूला ठेवून शिट्टी या चिन्हासमोर सभासद बंधूंनी लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन गावभेट दौऱ्यावेळी पॅनलच्यावतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *