दिवे घाटात महामार्गाचे काम वेगात सुरू आहे, मोठ मोठ्या अवजड यांत्रिक मशीन द्वारे हे काम चालू आहे. मात्र याच अवजड मशिनींच्या वाहनांमुळे दिवे घाटात रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मशिनींच्या लोखंडी चाकांमुळे रस्त्याला उभ्या आडव्या खड्ड्यांची माळच तयार झाली आहे. याशिवाय धबधब्याचा वळणावर रस्ता पूर्णपणे उखडला आहे. तीव्र उताराने वेगात येणाऱ्या वाहन चालकांना खराब रस्त्यामुळे वाहन नियंत्रित करणे अवघड होत आहे. खराब रस्त्यामुळे दुचाकी चालकांची दयनीय अवस्था होत आहे. घाट मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करावी अशी मागणी वाहनचालक करीत आहेत. खराब रस्त्यामुळे एखादा जीवघेणा अपघात होऊ नये यासाठी ही खराब रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी पुरंदर बस प्रवासी संघाचे अध्यक्ष तानाजी सातव यांनी केली आहे.
दिवे घाटात रुंदीकरणाच्या कामामुळे रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष
