Headlines

सोनगाव येथे पारधी वस्ती येथे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा; मोठी भट्टी व रसायन नष्ट

बारामती तालुका पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क च्या वतीने मौजे सोनगाव येथे दारू भट्ट्यावर मोठ्या पोलीस फौज फाट्यासह कारवाई

सोनगाव – पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे सोनगाव पारधी वस्ती येथे अवैध हातभट्टी दारूची मोठी भट्टी लावण्यात आली आहे.पथकासह त्याठिकाणी छापा टाकला असता एक मोठी लोखंडी भट्टी अंदाजे ८०० लिटर कच्चे रसायन (वाॅश) व दारू गाळण्याचे साहित्य मिळून आले.यावेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाले.सदरचे रसायन जागीच नष्ट करण्यात आले व भट्टी उध्वस्त करण्यात आली.महाराष्ट्र दारूबंदी कायदा ६५ (फ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.सदर कारवाईदरम्यान एक आरोपी मिळून आला असून त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचेसह एपीआय पवार,जी‌.पी.एस.आय शिंदे,ए.एस.आय शिंदे,हेड कॉन्स्टेबल पवार,हेड कॉन्स्टेबल देशमाने,हेड कॉन्स्टेबल खारतोडे,पोलीस कॉन्स्टेबल खटके,पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे,पोलीस कॉन्स्टेबल कदम,पोलीस कॉन्स्टेबल तरंगे,हेड कॉन्स्टेबल कांबळे,Whc खेत्रे,Whc पोमणे सोबत आरपीसी पथक २ राज्य उत्पादन शुल्क बारामती विभाग यांचे उपाअधीक्षक गणेश कसरे,निरीक्षक देवदत्त पोटे,दुय्यम निरीक्षक सागर साबळे,गिरीश कुमार करचे,मनोज होलम,प्रदीप झुंजुरुक,मयूर गाडे,दिनेश ठाकूर,प्रदीप मोहिते,प्रणव मेहता,शितल शिंदे,सुनील वाघ,दिनेश सूर्यवंशी, विनोद शिंदे,विनोद इंजे,चरण कुंटे व कर्मचारी कारवाईदरम्यान हजर होते.सदर कारवाई पोलीस निरीक्षक नारायण पवार व पथकाने केली असून अशाच प्रकारच्या अवैध धंद्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे.