Headlines

हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांना अटक थेट येरवडा कारागृहात रवानगी

वडगाव निंबाळकर – वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या कोमल प्रमोद नवले व जयश्री प्रकाश नवले,दोन्ही रा.निंबुत,ता.बारामती, जि.पुणे यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.सदर दोन्ही महिलांना अटक करून येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे.

याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 231/2026 भारतीय न्याय संहिता कलम १२३ व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.सदर कारवाई ही 26/10/2026 रोजी करण्यात आली.

सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे,पोलीस शिपाई निलेश जाधव,नागनाथ परगे,आरती तोडेकर व विकास येटाळे यांनी केली.