Headlines

“राज्य उत्पादन शुल्क, बारामती विभागाची अवैध गावठी दारू निर्मिती धंद्यांवर मोठी धडक कारवाई;

८ गावठी दारू निर्मिती ठिकाणांवर छापे टाकून रु. २,१८,८००/- किंमतीचे रसायन आणि दारूचा नाश”

बारामती – दि. २८/१०/२०२६ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मा.आयुक्त श्री.राजेश देशमुख साहेब,मा.सहसंचालक साहेब (कायदा आणि सुव्यवस्था), मा.विभागीय आयुक्तसो., मा.अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, पुणे श्री.अतुल कानडे साहेब व मा.उपअधीक्षक श्री.गणेश कासरे साहेब हडपसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करणेकामी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बारामती विभाग, दौंड विभाग,सासवड विभाग,एच विभाग,भरारी पथक-२ (पुणे) व बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे सोनगाव,मेखळी आणि वाघळवाडी परिसरात गोपनीय खात्रीलायक बातम्यांनुसार निर्मितीच्या ८ अड्ड्यांवर छापे टाकून तपासणी केली असता,सदर ठिकाणी ११० लिटर तयार गावठी दारू आणि ५,१८० लिटर कच्चे रसायन मिळून आले.

सदर कारवाईत मिळून आलेली अवैध गावठी दारू आणि कच्चे रसायन जागीच नाश करण्यात आले असून,भट्टीचे इतर साहित्य व दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे.सदर जप्त मुद्देमालाची एकूण किंमत रु. २,१८,८००/- अक्षरी रुपये (दोन लाख अठरा हजार आठशे) इतकी असून सदरच्या गुन्ह्यात एकूण ०७ आरोपींना अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे व एक आरोपी फरार आहे.तपासामध्ये सदरची अवैध गावठी दारूनिर्मिती साठी लागणारे कच्चामाल पुरवठादार कोण-कोणाला देणार होते तसेच यामध्ये स्थानिक पातळीवर कोणाचा सहभाग आहे हे निष्पन्न होणे बाकी आहे.

सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक,दुय्यम निरीक्षक व जवान तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने भाग घेतला.या गुन्ह्यांचा पुढील तपास तपासाधिकारी दुय्यम निरीक्षक श्री एस.एम.साबळे (बारामती बीट क्र.१),श्री.एम.पी.होलम(बारामती बीट क्र.२) आणि श्री.गिरीशकुमार करचे (बारामती बीट क्र.३हे करीत आहेत.

नागरिकांना आवाहन

पुणे जिल्ह्यातील फुगेवाडी परिसरात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घातकृत्याच्या व विषारी दारूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नागरिकांना विशेष आवाहन करण्यात येते की,आपल्या परिसरात कुठेही अवैध गावठी दारू निर्मिती किंवा विक्री होत असल्याची माहिती असल्यास ती तात्काळ मा‌अधीक्षक कार्यालयास कळवावी.