माळेगाव कारखान्याचे उपाध्यक्ष नितीनकुमार शेंडे व संचालक योगेश भैय्या जगताप यांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी
बारामती – बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखाना कार्यक्षेत्रात पणदरे गटातील धुमाळवाडी येथे अचानक विजेच्या घर्षणामुळे पाच ते सहा शेतकऱ्यांच्या तब्बल बारा एकर ऊस व त्या सोबतच ठिबक सिंचन संच जळून खाक झाला.यामुळे अनेक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.
श्री.कोकरे यांच्या उसाची तोडणी चालू असताना मंगळवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे अचानकपणे आग लागली,त्या सोबतच शेजारील प्रदीप काशिनाथ जगताप यांचा एक एकर ऊस व ठिबक सिंचन संच तसेच शिवाजी मारुती कोकरे यांचा एक एकर ऊस व ठिबक सिंचन संच,त्याबरोबर बाळासाहेब वाघमोडे यांचा तीन एकर ऊस व ठिबकसिंचन संच आणि लोटकरे यांचा पाच ते सहा एकर असा सर्वांचा मिळून बारा एकर ऊस तोडणीच्या पूर्वीच शॉर्ट सर्किट मुळे जळून भस्मसात झाला.यावेळी उसाला लागलेल्या आगीमुळे प्रचंड धुराचे लोट आस्मानात उसळत होते,धुराचे लोट आकाशात दिसत होते.दरम्यान तातडीने माळेगाव कारखान्याने आपल्याकडील यंत्रणा तातडीने घटनास्थळी पाठवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.यावेळी कारखान्याचे कार्यतत्पर उपाध्यक्ष नितीनदादा शेंडे,कारखान्याचे दुसरे अभ्यासू संचालक योगेशभय्या जगताप यांनी शेतकऱ्यांच्या अचानक जळालेल्या उसाची प्रत्यक्ष पाहणी केली असता,या उसाला ताबडतोब माळेगाव कारखान्याची यंत्रणा पाठवून ऊस गळपासाठी तोडणी करण्याच्या कारखान्याला तातडीने सुचना देण्यात आल्या व ऊस तोडणीस सुरुवात करण्यात आली आणि ऊस साखर कारखान्यावर आणला.
