Headlines

लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलची जोरदार शक्ती प्रदर्शन करत सांगता सभा

शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे मा.आमदार संजय जगताप व पुरुषोत्तम जगताप यांच्यावतीने आवाहन

सोमेश्वरनगर – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल प्रमुख माजी चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप व पुरंदरचे मा.आमदार संजय जगताप यांनी कारखाना परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मुगुटराव आप्पा काकडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सांगता सभेस सुरुवात करण्यात आली.सभासदांच्या हितासाठी व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्य करणार असल्याचे पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.तसेच सर्व सभासदांनी कारखान्याच्या विकासासाठी शिट्टी या चिन्हासमोर शिक्का मारून लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन पुरुषोत्तम जगताप व संजय जगताप यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *