१४ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतुकीविरोधात माळेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत देशी दारू, गावठी हातभट्टीची दारू, कार व मोटारसायकल असा एकूण १४ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अहिल्यानगर जिल्ह्यातील दानेवाडी येथे सुरू असलेली गावठी हातभट्टीची भट्टीही उद्ध्वस्त करण्यात आली.
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे साडेनऊ वाजता माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे व पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत अवैध दारू वाहतुकीची माहिती मिळाली.
राजापूर-दानेवाडी, ता. श्रीगोंदा येथील शेखर श्रीरंग पवार (वय २४) हा मोटारसायकलवरून गावठी हातभट्टीची दारू घेऊन माळेगाव बुद्रुक येथील कैलास शंकर गव्हाणे (वय ३६) यास विक्रीसाठी देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कहऱ्हावागज चौकात सापळा रचण्यात आला.
सापळ्यादरम्यान संशयित मोटारसायकल आल्यानंतर काही वेळाने माळेगावच्या दिशेने मारुती सुझुकी अल्टो कार आली. मोटारसायकलवरील इसमाने काळ्या रंगाचे कॅन कारमध्ये ठेवताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
वाहनांची झडती घेतली असता देशी दारूचे ३३ बॉक्स, गावठी हातभट्टीची तयार दारू असलेले
