Headlines

एस. टी बसच्या चाकाखाली आल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू,

अंगावरून एस. टी बसचा चाक गेल्याने तरुणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.हा अपघात मंगळवार (दि.२४) रोजी राजगुरूनगर जवळ राक्षेवाडी येथे संध्याकाळी सातच्या सुमारास घडली.
कु.सोनाली रोहिदास कोळेकर (वय २२) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
सोनाली कोळेकर ही खेड तालुक्यातील भोमाळे गावची रहिवाशी असून ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी राक्षेवाडी गावच्या हद्दीत राहात होती.सोनाली ही सायंकाळच्या दरम्यान राक्षेवाडी गावातील गणेश मंदिर समोरील मुख्य रस्त्याने स्कुटीवरून जात असताना वाफगाव गुळाणी गावाकडे प्रवाशी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने तिला जोराची धडक दिली त्यात ती खाली पडली आणि बसचे चाक तीच्या पोटावरुन गेल्याने तिचा मृत्यू झाला.अपघात घडताच बसचे वाहक व चालक पळून गेले.
सोनाली ही सुतार समाजाची असून गरीब कुटुंबातील मुलगी होती.अधिकारी होण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले होते. घरची गरीब परिस्थिती असताना देखील मोठ्या जिद्दीने ती एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होती.चार बहिणीत ही सर्वात लहान होती.तिच्यामागे आई,वडील बहिणी असा परिवार आहे.तिच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांचा आक्रोश चांडोली ग्रामीण रुग्णालयात सुरू होता.तिच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.