Headlines

“पुण्याचा इतिहास आता प्रकाश-ध्वनीच्या माध्यमातून जिवंत होणार; महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘पुनवडी ते पुणे’ शो”

शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक तटबंदीवर पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचा प्रकाशमय प्रवास; पुणेकरांनी आवर्जून अनुभवण्याचे महापौरांचे आवाहन

पुणे शहराचा समृद्ध, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘पुनवडी ते पुणे’ या लाईट अँड साऊंड शोची निर्मिती करण्यात आली आहे. शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात या विशेष उपक्रमाचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

पुणे महानगरपालिका आणि ‘पुणे प्रथम’ यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या शो च्या माध्यमातून ‘पुनवडी’ ते आधुनिक ‘पुणे’ असा शहराच्या विकासाचा, इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा प्रवास प्रकाश, ध्वनी आणि दृक्-श्राव्य माध्यमातून जिवंत करण्यात आला आहे. शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक वास्तूवर साकारण्यात येणारा हा अनुभव पुण्याच्या इतिहासाशी नागरिकांना आणि पर्यटकांना जोडणारा ठरत आहे.

पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करतानाच तो आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेला या उपक्रमातून मूर्त स्वरूप मिळाले आहे. पुणेकरांसह शहरात येणाऱ्या पर्यटकांनी हा आगळावेगळा आणि माहितीपूर्ण लाईट अँड साऊंड शो आवर्जून पाहावा, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले आहे.

‘पुनवडी ते पुणे’ हा लाईट अँड साऊंड शो दि. १९ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता शनिवार वाडा येथे नागरिकांसाठी सुरू राहणार आहे. पुण्याचा इतिहास, संस्कृती आणि वैभव आधुनिक पद्धतीने अनुभवण्याची ही विशेष संधी असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक तटबंदीवर पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचा प्रकाशमय प्रवास; पुणेकरांनी आवर्जून अनुभवण्याचे महापौरांचे आवाहन

पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : पुणे शहराचा समृद्ध, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘पुनवडी ते पुणे’ या लाईट अँड साऊंड शोची निर्मिती करण्यात आली आहे. शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात या विशेष उपक्रमाचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

पुणे महानगरपालिका आणि ‘पुणे प्रथम’ यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या शो च्या माध्यमातून ‘पुनवडी’ ते आधुनिक ‘पुणे’ असा शहराच्या विकासाचा, इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा प्रवास प्रकाश, ध्वनी आणि दृक्-श्राव्य माध्यमातून जिवंत करण्यात आला आहे. शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक वास्तूवर साकारण्यात येणारा हा अनुभव पुण्याच्या इतिहासाशी नागरिकांना आणि पर्यटकांना जोडणारा ठरत आहे.

पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करतानाच तो आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेला या उपक्रमातून मूर्त स्वरूप मिळाले आहे. पुणेकरांसह शहरात येणाऱ्या पर्यटकांनी हा आगळावेगळा आणि माहितीपूर्ण लाईट अँड साऊंड शो आवर्जून पाहावा, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले आहे.

‘पुनवडी ते पुणे’ हा लाईट अँड साऊंड शो दि. १९ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता शनिवार वाडा येथे नागरिकांसाठी सुरू राहणार आहे. पुण्याचा इतिहास, संस्कृती आणि वैभव आधुनिक पद्धतीने अनुभवण्याची ही विशेष संधी असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *