Headlines

एआयमुळे नवीन नोकऱ्या निर्माण होतील – आयुक्त नीरज कंसल


एआयला “उत्तम प्रश्न विचारून चांगला उपयोग करून घ्या. एआयचे केवळ निष्क्रिय ग्राहक बनू नका.एआयमुळे काही नोकऱ्या जाऊ शकतात, भविष्यात एआयमुळे नवीन संधी आणि रोजगारही निर्माण होतील. असा अंदाज सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स पुणे झोनचे मुख्य आयुक्त नीरज कंसल यांनी व्यक्त केला.
आकुर्डी येथील डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या ‘दीक्षारंभ’ विद्यार्थी स्वागत समारंभाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
यावेळी डीवाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सीटीचे कुलगुरू प्रा मनिष भल्ला, डी वाय पी प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील,इंजिनिअरिंग विभागाच्या डीन डॉ.अनुपमा पाटील, नॉन इंजिनियरिंगच्या डीन डॉ.माधवी देशपांडे, डॉ.मधुरा जगताप,सीआयआयईचे सल्लागार प्रा. योगेश ब्राह्मणकर यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू प्रा. डॉ. मनीष भल्ला म्हणाले की, आमचे विद्यापीठ इनोव्हेशन (नवनिर्मिती) आणि इन्क्युबेशन आणि वैद्यकीय, समूह तांत्रिक यावर वर अधिक भर दिला जातो. सेमीकंडक्टर इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक अभ्यासक्रम सुरू करणारे DYPIU हे पहिले खाजगी विद्यापीठ ठरले आहे. तसेच, चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ ‘स्कूल ऑफ लीगल स्टडीज, गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी’ सुरू करत आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी’ सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रिया चार्ल्स यांनी तर आभार डीन डॉ मोईद्दीन बिरार यांनी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *