Headlines

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने वाहतुकीत बदल; माळेगाव पोलिसांकडून वाहतुकीस पर्यायी मार्ग उपलब्ध

????????????????????????????????????

माळेगाव – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना,सोमेश्वरनगर येथील सन २०२६ मधील पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने दि. १२/१०/२०२६ रोजी सकाळी ०७.०० वाजल्यापासून ते दि. १३/१०/२०२६ रोजी सकाळी ०७.०० वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.सदर मतमोजणीसाठी माळेगाव बुद्रुक, ता.बारामती,जि.पुणे येथील मतमोजणी केंद्राच्या परिसरात राजकीय पक्षांचे पदाधिकारी,उमेदवार,कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, अपघात घडू नयेत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित कालावधीत बारामती-निरा मार्गावरील वाहतुकीत बदल करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

वाहतुकीतील बदल व पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे :

दि. १२/१०/२०२६ रोजी सकाळी ०७.०० वाजल्यापासून ते दि. १३/१०/२०२६ रोजी सकाळी ०७.०० वाजेपर्यंत मौजे माळेगाव बुद्रुक,ता.बारामती,जि.पुणे येथील बारामती-निरा मार्गावरील शारदानगर ते माळेगाव राजहंस चौक या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे.

पर्यायी मार्ग : शारदानगर पासून के.व्ही. के ट्रस्ट केनॉल रोडने माळेगाव राजहंस चौक येथे व राजहंस चौक ते माळेगाव कारखाना मार्ग पाहुणेवाडी शारदानगर बारामती या मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यात येत आहे.

सदर वाहतूक बदलातून शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवांची वाहने वगळण्यात येणार आहेत.

नागरिकांनी व वाहनचालकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे,वाहतूक नियमांचे पालन करावे आणि प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा,असे आवाहन माळेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे.

— उप विभागीय पोलीस अधिकारी बारामती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *