Headlines

कोण होणार सोमेश्वर कारखान्याचा कारभारी ?

????????????????????????????????????

राजकीय नेत्यांसह सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे लक्ष मतमोजणीवर…….

तिरंगी लढतीमुळे उमेदवारांची धाकधूक वाढली

महाराष्ट्र राज्यातील दोन प्रमुख जिल्हे व चार तालुक्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वात जास्त भाव देणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक तिरंगी लढतीमुळे चुरशीची ठरली आहे.निवडणुकीत विजयी होण्यासाठी तिन्ही पॅनल प्रमुखांसह सर्व उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.प्रशासनाच्या सहकार्याने मतदान प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता शांतता आणि सुरक्षितेत पार पडली.श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी सभासदांकडून सायंकाळी चार वाजेपर्यंत ६८ % मतदान करण्यात आले.सभासदांच्या हितासाठी व विकासासाठी कार्य करणार असल्याचे पॅनल प्रमुखांनी जाहीरनाम्यात सांगितले असले तरी सभासद मतपेटीतून काय कौल देणार याकडे राजकीय,सहकार क्षेत्रातील नेत्यांसह अनेक दिग्गजांचे व सभासदांचे मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *