सोमेश्वरनगर – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या अंतर्गत होत असलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर,महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी वाघळवाडी येथील शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे ‘ब’ वर्गांतर्गत आपला मतदानाचा हक्क बजावला.
सहकारी साखर कारखाने हे ऊस उत्पादक शेतकरी,सभासद आणि त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक जीवनाशी निगडित महत्त्वाचे घटक आहेत.त्यामुळे कारखान्याच्या भविष्यासाठी प्रत्येक सभासदाचे मत मोलाचे आहे.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी होऊन आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा.सभासदांचा सक्रिय सहभाग हीच सहकारातील लोकशाही अधिक बळकट करण्याची गुरुकिल्ली आहे.
