तरडोली – कृषी विज्ञान केंद्र बारामती आयोजित तूर व उडीद या पिकाचे प्रशिक्षण व खते व औषधे वाटप करण्यात आले. भैरवनाथ मंदिर,वडाचा मळा,तरडोली गावामध्ये याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन मा.श्री.राजेंद्र दादा पवार या ठिकाणी उपस्थित होते.तसेच कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ करंजे सर,गावडे सर,कृषी विभागाचे मंडल अधिकारी लोधाडे सर व लोणकर सर ज्यांनी तरडोली गावामध्ये पाठीमागे कृषीचे चांगले काम केले ते प्रसाद तावरे सर यांचा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.तसेच गावातील कार्यरत प्रगतशील शेतकरी भारतीताई भापकर तसेच सतीश दरेकर,जनार्दन भोसले,गणपत मासाळ,गरुड अशा अनेक शेतकऱ्यांचा या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन राजेंद्र दादा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन बदल घडवून जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल,याचे मार्गदर्शन शास्त्रज्ञ करंजे सर व कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन राजेंद्र दादा पवार यांनी मार्गदर्शन केले.तरडोली गावचे प्रगतशील शेतकरी मंगेश खताळ यांनी तुर पिकाविषयी त्यांचा अनुभव सांगितला.यावेळी कार्यक्रमाला तरडोली गावचे प्रशासक महेंद्रजी तांबे,माजी डी.वाय.एस.पी सर्जेराव गाडे यांच्यासह अनेक शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन मंगेश खताळ यांनी केले.शेतकऱ्यांना या ठिकाणी खते व शेतीसाठी उपयुक्त अशा औषधांचे वाटप करण्यात आले.तरडोली गावातील शेतकऱ्यांच्या वतीने कृषी विज्ञान केंद्र यांचे आभार मानले.
कृषी विज्ञान केंद्र बारामती आयोजित तूर व उडीद या पिकाचे प्रशिक्षण व खते व औषधे वाटप
