Headlines

मलाबार गोल्ड ॲंड डायमंड्सच्या वतीने रक्तदान व फ्री बाॅडी चेकअप शिबिर संपन्न

बारामती – पुणे जिल्हा तसेच बारामती तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या मलाबार गोल्ड ॲंड डायमंड्सच्या वतीने रक्तदान व फ्री बाॅडी चेकअप २०२६ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.रमेश भोईटे सर,निर्मला भोईटे,ॲड.महेशदादा देवकाते पाटील (सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य),सोमनाथ आप्पा गायकवाड,हेमलता परकाळे (शाखा व्यवस्थापक मलाबार गोल्ड अँड डायमंड बारामती शाखा),रोहित आवदे,शुभम कंगळे,रावसाहेब सायकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात सुरुवात झाली.मलाबार गोल्ड ॲंड डायमंड्सच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदाते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मान्यवरांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.तसेच सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने फ्री बाॅडी चेकअप शिबिराचे आयोजन केले होते.त्यावेळी सर्व कामगारांची तपासणी करण्यात आली.मलाबार गोल्ड ॲंड डायमंड्स,सोमाणी ऐलीट,सुभद्रा माॅल समोर,पेन्सिल चौक,बारामती याठिकाणी हे शिबिर संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *